अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात १३० पानांची रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात दुसरा मोठा दावा केला आहे.
तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलीस महासंचालकांना दिली होती, असे परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
एवढेच नव्हे तर, परमबीर सिंग यांनी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीची निःपक्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी.पुरावे नष्ट होण्यापूर्वी या प्रकरणी सतत्या तपासणे आवश्यक आहे.
पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. रश्मी शुक्ला, ज्या त्यावेळी राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनी पोलीस महासंचालकांना,
पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यावेळी या प्रकरणी अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करून पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असेही परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|