अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- कोरोनाचे संकट अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. कोरोनाच्या विषाणूचा मोठा फटका भारताला बसला आहे. इतकेच नव्हे तर भविष्यातही कोरोना विषाणूचे आणखी व्हेरियंट येण्याची शक्यता एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी वर्तवली आहे.
भविष्यातील कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेत भारताला कोविड लसीकरणासोबतच बूस्टर डोसची व्यवस्था करण्याची गरज आहे, असेही संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. बुस्टर लसींची चाचणी आधीपासून सुरू आहे.

एकदा संपूर्ण लोकसंख्येला पहिले दोन डोसचे लसीकरण पूर्ण झाले की त्यानंतर बूस्टर डोस देण्यासाठी पावले उचलावी लागतील. हा बूस्टर डोस लस घेणाऱ्याला अधिक विषाणूंपासून संरक्षण देईल, असे गुलेरिया यांनी सांगितले आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी (children )घातक असल्याचं म्हटले जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करण्यास सांगितले जात आहे. अशातच मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचं लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून लस देण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून मुलांचे लसीकरण सुरु होईल असेही सांगण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम