खासदार सुजय विखें याना बदनाम करण्याचा प्रयत्न निषेधार्ह

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात राजकीय आकसापोटी व सूडबुद्धीने काही समाजसेवकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असा आरोप पांगरमलचे सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी केला आहे.

सरपंच आव्हाड म्हणाले, विखे हे नागरिकांना सुविधा पुरवतात आणि ती धमक त्यांच्यातच आहे हेच विरोधकांना खुपत आहे.

ज्यांनी ही याचिका दाखल केली त्यांचा आजपर्यंत सामाजिक व राजकीय इतिहास पाहता त्यांचे समाजाप्रती किती आणि काय योगदान आहे हे जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे. स्वतः काहीच करायचं नाही आणि दुसरे करत असेल तर त्यांनाही काही करू द्यायचं नाही, अशी भूमिका योग्य नाही.

सध्याच्या कोविड स्थितीत गरज ओळखून रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे पाहून खासदार डॉ. विखे यांनी इंजेक्शने खरेदी करून स्वखर्चाने नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात व शिर्डी येथील साईबाबा रुग्णालय, प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालय व गरजू रुग्णांना वितरित केले.

त्रस्त सामान्य जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला असताना जनतेला सहकार्य मदत करायचे सोडून स्वतःच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विखेंविरोधात याचिका दाखल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे, असे आव्हाड म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe