बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट घोगावु लागले….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-वातावरणात पुन्हा बदल होऊ लागला आहे. कडाक्याच्या उन्हातून वातावरण ढगाळू झाले आहे. हळूहळू वाऱ्याचा वेग देखील वाढू लागला आहे.

यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी दुपारपासूनच उष्मा अधिक जाणवत होता. ढगाळ वातावरण व वाराही वाहू लागला.

सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान नगर शहरासह जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीगोंदा, राहाता, पारनेर तालुक्यांतील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाने काळ अचानक हजेरी लावली.

यामध्ये श्रीगोंदा, राहाता, पारनेर, कोपरगाव…. अचानक आलेल्या पावसाने काही ठिकाणी कांदा भिजला, तर आंब्याच्या कैऱ्यांचा सडा पडला. महिनाभरात अवकाळीचा शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा तडाखा बसला.

दरम्यान महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसासह वादळ, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात त्यावेळी कांदा, गहू, हरभरा, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

त्यातून बाहेेर पडत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. रब्बी हंगामातही सलग दुसऱ्यांदा अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe