अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातच अनेक रुग्ण उपचाराऐवजी गोळ्या औषधे घेऊनच घरी राहतात.
अशी अनेक बाबी उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्वपूर्ण आदेश मेडिकल चालकांना दिला आहे.
जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर चालकांसाठी आदेश देण्यात आले असून यात कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून करोना बाधित रुग्णांना वैद्यकीय तज्ञांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय करोनाची औषधे देण्यात येऊ नयेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश सोमवारी रात्री उशीरा काढले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून दैनदिन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
त्यातच काही मेडिकल स्टोअरमधून करोना बाधित रुग्णांना डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन (चिठ्ठी) शिवाय करोनाची औषधे देत असल्याचे निदर्शनास आले ही बाब गंभीर असून यापुढे करोना रुग्णांना परस्पर मेडिकलमधून औषधे देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|