मतिमंद युवकाला विनाकारण मारहाण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  खासगी गाडीतून सध्या वेशात आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी येथील चिकन दुकानदार व मतिमंद युवकाला विनाकारण मारहाण केल्यामुळे संतापलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगला चोप दिला

काल संध्याकाळी नगरपालिका कार्यालयाच्या मागील बाजूस छापा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या राज्य उत्पादन शुल्क च्या कर्मचाऱ्यांनी एका मतिमंद मुलास काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली

हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये चित्रण करण्यात आला आहे दरम्यान शहरातील नागरिकाला विनाकारण मारहाण होत असल्याने जमलेल्या नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना हिसका दाखवला.

जमावाचे उग्र रूप पाहून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe