खासदार विखेे यांच्यामुळे ‘त्या’ कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा!  

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- एकलव्य समाज हा उदरनिर्वाहासाठी खारेकर्जुने येथील के.के.रेंज परिसरात ४० ते ५० वर्षापासून वास्तव्यास आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नव्हते. पहिल्यांदा त्यांना रेशनकार्ड, जातीचे दाखले, आधार कार्ड मिळून दिले.

त्यानंतर या कुटुंबांना स्वत:चे हक्काचे घर असावे या उद्देशाने खारे कर्जुने येथे २० गुंठ्ठे जागा खरेदी करून या ठिकाणी केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून ६० घरांचा प्रकल्प राबविण्यात आला. यासह केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेवून जाण्यासाठी मी कटीबध्द आहे.

कोरोनाच्या संकट काळामध्ये केंद्र सरकारने महत्वाची भुमिका पार पाडली असल्याचे प्रतिपादन खासदरी डॉ.सुजय विखे पा. यांनी केले. नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे खा.विखे पा.यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या एकलव्य समाजासाठी पूर्ण झालेल्या घरकुल योजनेची पाहणी करण्यात आली.

यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, खरेदी विक्री संघाचे संचालक अंबादास शेळके, कैलास लांडे, माजी सरपंच सबाजी पानसंबळ,

अजित तांबे,अमोल निमसे, रसिद सय्यद, लहानू बोरूडे, अनिल निमसे, रामेश्वर निमसे, विजय लांडगे, भाऊसाहेब काळे, ग्रामसेविका श्रीमती प्रियंका भोर आदी उपस्थित होते. कैलास लांडे म्हणाले की, एकलव्यासाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेमध्ये विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या,

परंतु खा.विखे यांनी मार्ग काढीत हा प्रकल्प राबविला. त्यामुळे ६० कुटुंबाला स्वत:चे हक्काचे घर मिळाल.े  पुढील काळात १५ कुटुंबानाही याच ठिकाणी घर मिळणार आहे. या ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते झाले. याचबरोबर पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्यात आले. सौर पथदिवे बसविण्यात आले.

गावच्या विकासासाठी आम्ही खा.विखे पा. यांच्या कडून निधी उपलब्ध करून घेवू. ही योजना पूर्ण करण्यासाठी विविध स्वच्छ भारत अभियान, नरेगा शौचोलय, शबरी आवास योजनेचा निधी उपलब्ध झाला असल्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe