अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. यामुळे जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालये तुडुंब भरली आहे.
रुग्णांना आयसीयु, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे मुश्किल झाले आहे. यामुळे दरदिवशी रुग्ण मृत्यूच्या दारी पोहचत आहे.

यामुळे रुग्णांचे प्राण वाचावे व त्यांना उपचार मिळावे यासाठी नगर शहरातील वाडिया पार्क येथे २ हजार बेड्चे सुसज्य जम्बो केअर सेंटर उभारावे.
अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे. जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे नागरीकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळण्यास अडचणी येत आहे.
यामुळे शहरातील वाडिया पार्क येथील मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. यामध्ये ५०० ऑक्सिजन बेड, ३०० व्हेंटिलेटर बेड व १२०० साधे बेड असावेत.
यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची तयारी जिल्हा प्रशासनाने तज्ञांच्या सहकार्याने करावी. तसेच रुग्णांवर उपचारासाठी यंत्रसामुग्री, औषधे, रुग्णवाहिका, ऑक्सीजन प्लांट आदी सुविधा तयार कराव्यात.
तातडीने आमच्या मागणीचा विचार करून जम्बो केअर सेंटर उभारण्याचा युद्धपातळीवर निर्णय घ्यावा. अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|