बिग ब्रेकिंग : अखेर पंतप्रधान मोदींनी केली घोषणा ! ३ जानेवारी पासून…

Ahmednagarlive24
Published:

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवली आहे. आता भारतातही ओमायक्रॉनचा (Omaicron) धोका वाढला आहे.याबाबत थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केल आहे. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे,येत्या ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरु होणार आहे. (Corona vaccination for children)

नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख 40 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात 61 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे.

तर 60 वर्षांपुढील 90 टक्के नागरिकांनी एक लस घेतली आहे. नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य होणार आहे. जेव्हा अनेक जिल्ह्यातील 100 टक्के लसीकरण (vaccinated) पूर्ण झाल्याच्या बातम्या येतात तेव्हा अभिमान वाटतो.

लसीकरणाबाबत सध्या देश सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. देशात 141 कोटी नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी या काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ओमायक्रॉनची सध्या चर्चा होत असून देशातील शास्त्रज्ञांचे त्यावर लक्ष असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, अनेक देशात ओमायक्रॉनचे संकट आले आहे. ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे.

परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 

  • – साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस देणार. त्याची सुरुवातही १० जानेवारीपासून.
  • – आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार. १० जानेवारीपासून तिसरा डोस.
  • – पंधरा ते अठरा वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करणार. ३ जानेवारीपासून लसीकरण.
  • – ओमिक्रॉनला घाबरण्याचे कारण नाही. केवळ सतर्क राहा आणि कोविड नियम पाळा: पंतप्रधान मोदी

12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी

तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता DCGI ने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला ही परवानगी मिळाली आहे.

एका अहवालानुसार SEC ने ऑक्टोबरमध्ये DCGI कडे लहान मुलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोव्हॅक्सीन देण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe