अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास मोठी दिलासादायक माहिती दिली आहे.
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात मंत्री मुंडेंनी दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
शिक्षकांना देण्यात येणारे समकक्ष वाढीव अनुदान, भत्ते यांसह अन्य प्रश्नांसाठी अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री अजित पवार यांच्यासह अन्य विभागांसमवेत व्यापक बैठक घेतली जाईल.
तसेच 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भातील सर्व अडसर दूर करून दोन महिन्यांच्या आत 7 वा वेतन आयोग लागू करण्यात येईल अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत बोलताना दिली.
काँग्रेस नेते भाई जगताप तसेच आमदार जयंत आसगावकर यांनी 7 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आलेल्या अडचणींच्या संदर्भात अधिवेशनादरम्यान प्रश्न विचारला.
तसेच त्यांनी दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळावे अशी मागणी केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली.
तसेच अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेऊन हे अडसर दूर करण्यात येतील. तसेच येत्या दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल असेही मुंडे म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|