बोठेचा गुपचूप कॉल झाला उघड ; पोलिसांनी धाडल्या वकिलांना नोटिसा

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापिका रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केली आहे.

अटकेत असलेल्या बोठेनी पारनेर उपकारागृहातून वकिलांना फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान हि माहिती समजताच पोलिसांनी संबंधीत दोन वकिलांना नोटीसा पाठविल्या आहेत.

या नोटीसाद्वारे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बोठे सध्या पारनेर उपकारागृहात आहे. मागील महिन्यात पोलिसांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती.

यावेळी कारागृहातील आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते. या मोबाईलचा वापर बोठे याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

त्याने दोन वकिलांना तीन ते चार वेळा कॉल केले आहेत. या कॉलमधून काय संंभाषण झाले, कॉल करण्यामागील उद्देश काय होता.

याचा सर्व तपास पोलीस करत आहे. यासाठी संबंधीत वकिलांचे जबाब पोलीस नोंदविणार आहे. त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून अजून ते जबाब देण्यासाठी हजर झाले नसल्याचे निरीक्षक बळप यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe