अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेवर गोळीबार करीत अज्ञात दरोडेखोराने सुमारे ५ लाख रुपयांची रोकड भरदिवसा लुटून आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
हल्लेखोरास विरोध करणा। रे शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्या गोळीबार करण्यात असून छातीच्या खाली गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते संस्थापक अध्यक्ष असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेची नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे शाखा आहे.
शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शाखेबाहेर गेले असता पाळत ठेऊन असलेल्या दरोडेखोराने शाखेत प्रवेश केला.
रोखपाल महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिच्या जवळील सुमारे ५ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. दरम्यानच्या काळात शाखाधिकारी सोनवणे शाखेत पोहचले त्यांनी दरोडेखोरास झाडूने मारहाण करण्याचा सुरुवात केली असता दरोडेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला.
सोनवणे यांच्या छातीखाली गोळी लागली असून त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने सोनवणे यांना पुण्याकडे हलविण्यात आले आहे.संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ दातीर घटनास्थळी दाखल होऊन घटनेस त्यांनी दुजोरा दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम