अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये त्या व्यवसायाचे स्वरूपानुसार गुंतवणूक करणे क्रमप्राप्त असते. परंतु प्रत्येकच व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते असं नाही. असे अनेक प्रकारचे व्यवसाय सांगता येतील की त्यांची बाजारपेठेत मागणी भरमसाठ असते परंतु त्या मानाने ते व्यवसाय उभारण्यासाठी लागणारी गुंतवणूक मात्र खूप कमी लागते.
बरेच जण व्यवसाय उभारण्याच्या तयारीत असतात परंतु सगळ्यात मोठे समस्या भांडवलाची येते. यामध्ये प्रत्येक जण कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त आर्थिक नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात.त्यामुळेच या लेखांमध्ये आपण असे काही व्यवसाय पाहणार आहोत जे तुम्हाला एक लाख रुपयांच्या आत गुंतवणूक करून चांगला नफा देऊ शकतात.
एक लाख रुपये गुंतवणुकीत सुरू करता येणारे व्यवसाय
1- क्लाऊड किचन व्यवसाय– आपल्याला माहित आहे की एखादा फूड बार किंवा रेस्टॉरंट उघडवायचे असेल तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. परंतु हे भांडवलाचे प्रमाण कमी करण्यासाठी क्लाऊड किचन खूप लोकप्रिय ठरत आहे. क्लाऊड किचन म्हणजे फूड डिलिव्हरी करणे होय. या व्यवसायाकरिता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्याची गरज भासत नाही.
याकरिता तुम्ही तुमच्या घरातून स्वच्छ आणि उत्कृष्ट जेवण बनवून ते डिलिव्हर अर्थात संबंधित व्यक्तींना पुरवू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला स्वच्छ आणि स्वयंपाक करण्याकरिता योग्य असलेल्या जागेची गरज असते व चांगला स्वयंपाकी असेल तर या व्यवसायात खूप चांगल्या पद्धतीने जम बसवता येतो. साधारणपणे क्लाऊड किचन व्यवसायाची सुरुवात करण्याकरिता तुम्हाला पन्नास हजार रुपये भांडवलाची गरज भासू शकते.
2- बुटीक सर्विस– बुटीक सेवा हा सर्वात जास्त मागणी असलेले आणि आकर्षक कंपनीची संकल्पना असून आजकाल बरेच लोक हे उत्पादित कपड्यांपेक्षा कस्टम मेड आणि अनेक प्रकारचे डिझायनर कपडे मोठ्या प्रमाणावर वापरणे पसंत करतात. त्यामुळे तुम्ही जर फॅशन डिझायनिंग चे पदवीधर असाल किंवा सुंदर कपडे डिझाईन करण्यात किंवा ते तयार करण्यात तुम्हाला आवड असेल तर तुमच्या या आवडीचे रूपांतर तुम्ही चांगल्या व्यवसायामध्ये करू शकतात.
हा व्यवसाय सुरू करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे भाडे आणि इतर मालमत्तेसाठी लागणारा जो काही जास्तीचा खर्च असतो तो टाळता येतो व घरातूनच हा व्यवसाय अगदी आरामात सुरू करता येतो. साधारणपणे 25 हजार रुपयांच्या भांडवल गुंतवणुकीचा तुम्ही स्टिचिंग आणि डिझायनिंगशी संबंधित लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करून घरबसल्या बुटीक सेवा सुरू करू शकतात. यामध्ये कार्यक्षम शिलाई मशीन तसेच धागे, लेस, बॉर्डर, बटणे तसेच कापड व अजून बरच काही साहित्य लागते.
3- बेकिंग सर्विस– जर तुम्हाला बेकिंग मध्ये आवड असेल व यामध्ये तुम्ही कुशल असाल तर तुम्ही तुमच्या घरातून हा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वादिष्ट केक तसेच कुकीज, मफिन्स आणि हॉट पायपिंग ब्राऊनीज विकणारी बेकरी उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातून सुरुवात करू शकतात.
या व्यवसायामध्ये तुम्हाला जे काही साहित्य लागेल त्याकरिता अंदाजे 12000 रुपये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यामध्ये साधारणपणे ओहन टोस्टर ग्रील, बेकिंग मटेरियल तसेच बेकिंग मोल्ड, वजन मोजण्याचे यंत्र, केक बनवण्याचा टेबल आणि बेकिंग ॲक्सेसरीज यामध्ये स्क्रॅपर्स, बटरशीड तसेच नोझल्स आणि ब्लेंडर सारख्या इतर साहित्याची गरज भासते.
4- टिफिन सर्विस– अनेक लोक कामानिमित्त शहरात राहतात. त्यामुळे अशा लोकांना स्वादिष्ट घरगुती जेवण मिळणे दुरापास्त होते. पुढे बहुतांश व्यक्ती हे स्वादिष्ट घरगुती जेवणाच्या शोधात असतात. अशा पार्श्वभूमीवर तुम्ही जर टीफिन खाद्यपदार्थ पुरवणे हा छोटासा व्यवसाय सुरू केला तर यामधून उत्तम कमाई होऊ शकते. अगदी कमीत कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात.
5- इव्हेंट मॅनेजमेंट– इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय तुम्हाला एक लाख रुपयांपासून सुरू करता येणे शक्य आहे. व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही वाढदिवसाच्या पार्ट्या तसेच लग्न, इतर औपचारिक कार्यक्रम, वैयक्तिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमापासून विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होतो.
या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही अधिकाधिक सेवा क्लाइंटला देऊ शकतात व त्या बदल्यात शुल्क आकारून पैसे मिळवू शकतात. यामध्ये तुम्हाला संबंधित कार्यक्रमाची सजावटी पासून फोटोग्राफर, खाण्यापिण्याची सोय तसेच इतर संपूर्ण कार्यक्रमाचे आवश्यक संयोजन करणे अभिप्रेत असते. त्यामुळे हा व्यवसाय देखील तुम्हाला चांगला पैसा देऊ शकतो.