नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यातील कान्होळा नदी पात्रातुन वाळू तस्कर अवैध वाळू उत्खनन करीत असतानाच कर्जत पोलिसांनी धाड टाकून संबंधित ठिकाणाहून वाळूसह एक ट्रॅक्टर जप्त केला आहे.

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाचपुते, गोरख जाधव यांनी सदर कारवाई केली आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणाहून महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर ५०५ व वाळू भरलेली ट्रॉली ताब्यात घेतली.

असा वाळूसह ५ लाख १० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. कर्जत पोलीस ठाण्यात वाळूचोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार जालिंदर पाचपुते करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe