केंद्राचा बळीराजाला दिलासा! खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- सलग दोन वर्ष कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पुरता हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मोदी सरकारने काहीसा दिलासा दिला आहे .

कोरोनामुळे लॉकडाउन केले त्यामुळे हाताला काम नाही व शेतात असलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाले. त्यात परत वाढलेली महागाई यामुळे बेजार झालेल्या बळीराजाला सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत काहीसा दिलासा दिला आहे.

खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत परवानगी दिली आहे. खरीप पिकासाठी सरकारने हमीभावात ५० ते ६२ टक्के वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या किमतीत प्रतिक्विंटल ४५२ ​​रुपये एवढी वाढ झाली आहे.

तिळानंतर तूर आणि उडीदसाठी दोन्ही ३०० रुपये क्विंटल सर्वाधिक एमएसपी ठरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा या दृष्टीने एमएसपीमध्ये सरकारने वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. भाताच्या किमतीत ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

त्यासोबतच बाजरी २१५० रुपये प्रतिक्विंटलवरून २२५० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. दरम्यान,केंद्र सरकार गेल्या सात वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून, त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नेहमी तयार असल्याचेही कृषीमंत्री तोमर सिंह म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe