राज्यातील सर्वात मोठी बातमी : पुढचे पंधरा दिवस राज्यात १४४ कलम लागू ! वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे LIVE !

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. व राज्यात पुढील १५  दिवसांसाठी कडक निर्बंध आणण्यात आले आहेत. 

राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

15 दिवस ही संचारबंदी राहणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच या संचारबंदीतून अत्यावश्यक सुविधा वगळण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी 5400 कोटी रुपयांचं लॉकडाऊन पॅकेज जाहीर केलं. यामध्ये रिक्षावाले, फेरीवाल्यांपासून हातवर पोट असणाऱ्या अनेक घटकांचा समावेश आहे.

याशिवाय राज्यातील 7 कोटी नागरिकांना 3 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ महिनाभर मोफत दिलं जाणार आहे. इतकंच नाही तर गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. रोजी बंद झालीय पण रोटी बंद होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

  1. पुढचे पंधरा दिवस राज्यात १४४ कलम लागू !
  2. कोणत्याही व्यक्तीस योग्य कारण नसल्यास घराबाहेर पडण्यास परवानगी नाही
  3. सकाळी सात ते रात्री आठ ह्या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु
  4. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु (केवळ अत्यावश्यक सेवेसाठी)
  5. हॉटेल्स बंद मात्र पार्सल सेवा सुरु
  6. रस्त्यावरील खाद्यपदार्थ सुरु
  7. परवानाधराक रिक्षाचालकांनाही 1500रुपये देणार
  8. अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार
  9. नोदणीकृत घरकामगारांनाही निधी देणार
  10. रोजी थांबेल पण सरकार रोटी थांबू देणार नाही.
  11. शिवभोजन थाळी गरीबांना महिन्याभर मोफत देणार

(लाईव्ह अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करा)

 

वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे LIVE !

  • आता काही कठोर निर्बंध घालणे गरजेचे आहे
  • एकजुटीने या संकटाचा समाना करायचा आहे.
  • ही उणीदुणी काढण्याची, राजकारणाची वेळ नाही
  • त्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.
  • आरोग्य सेवा वाढवल्यावर डॉक्टर्सची गरज लागणार आहे.
  • वाढवलेल्या आरोग्य सेवाही कमी पडत आहे. मात्र, आपण सर्व समस्यांचा मुकाबला करणार आहोत.
  • गेल्या लाटेपेक्षा ही लाट मोठी आहे. त्यात किती वाढ होईल, ही लाट कधी नियंत्रणात येईल, हे सांगणे कठीण आहे
  • लसीकरणामुळे आगामी लाटेचा वेग कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
  • आताची लाट प्रंचड मोठी आहे. काही गोष्टी करूनच यातून बाहेर पडावे लागणार आहे.
  • लसीकणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे.
  • केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातूनही मागणी केली आहे.
  • आपण रुग्णसंख्या लपवत नाही, पारदर्शकपणे परिस्थिती मांडली आहे.
  • बेड, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसीवीर कंमतरता या समस्या आहेत.
  • ही वेळ हातातून निघून गेल्यास परिस्थिती बिकट होईल.
  • आपली परीक्षा आपल्याला पुढे ढकलता येणार नाही. हा काळ खूप महत्त्वाचा आहे.
  • सध्याची परिस्थिती बघता एमपीएससी, दहावी, बारावीच्या परीक्षआ पुढे ढकलल्या आहेत.
  • बेडची संख्याही वाढवली आहे. मात्र, या यंत्रणांवर ताण येत आहे.
  • चाचण्यांची संख्या वाढवली आहे. 85 हजारहून अडीचलाखांपर्यंत चाचण्या होत आहे.
  • कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्याची आकडेवारी भयानक आहे.
  • कोरोना रुग्णांचा आजचा आकडा सर्वाधिक, कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • कोरोना विरोधातल्या युद्धाचा पुन्हा एकदा सुरुवात झालीय : मुख्यमंत्री
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe