अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबात दि. ९ एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे.
त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा निर्णय त्वरित घेतला जावा, यासाठी आपण सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. आता पुण्यात यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे.
त्यात आवर्तनाचा विषय मार्गी लागेल. पाण्याची उपलब्धता व वापर, या बाबत श्रीगोंद्यावर अन्याय होणार नाही, याची लोकप्रतिनिधी म्हणून दक्षता घेतली जाईल.
विसापूर कालव्याखालील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या मागणीसाठी ५ एप्रिल रोजी श्रीगोंद्यात कुकडी विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. घोडद्वारे नदीवरील बंधाऱ्यांत पाणी सोडण्याची मागणी आपण यापूर्वी केली होती.
सरकारने याची दखल घेतली आहे. ५ एप्रिल रोजी शिरूरचे आमदार अशोक पवार व माझ्या उपस्थितीत घोडमधून बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे.
त्याचा फायदा श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना होईल, असा दावा आ. पाचपुते यांनी निवेदनात केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|