दिलासादायक ! नगर शहरासाठी प्राप्त झाले एवढे कोरोना लसीचे डोस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- महाराष्ट्र दिनपासून 18 वर्ष ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा कार्यक्रम नगर शहरामध्ये सुरू झाला असून अहमदनगर महानगर पालिकेला शासनाकडून 10 हजार लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहे.

दरम्यान नगर महानगरपालिकेच्या वतीने 18 वर्ष ते 44 वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपायुक्त यशवंत डांगे,

तसेच डॉक्टर, नर्स आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. नगर महानगर पालिकेला शासनाकडून 10 हजार लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहे.

शहरांमध्ये पाच लसीकरण केंद्रावर दररोज दीड हजार लसीकरणाचे डोस दिले जाणार आहेत. यासाठी नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप वर नोंदणी करणे बंधनकारक असून तरी सर्व नागरिकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe