“कर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कर्जतमधील मिरजगाव व जामखेड येथील खर्डा भागात एकूण ५ कोटी ७४ लाखांचे प्रत्येकी ३ हजार मेट्रीक टन क्षमतेचे राज्य वखार महामंडळाचे भव्य वखार उभे राहणार असून आ. रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे.

वखार उभारणीच्या कामाला मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसात वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे. यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील शेतक-यांची शेतमाल ठेवण्याच्या जागेची चिंता कायमची मिटणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात आरोग्यसुविधेला प्राधान्य देण्यासोबतच आपल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील इतर सोयीसुविधांबाबत कोणत्याही प्रकारची कसूर न सोडता जनहिताचे विविध प्रश्न सोडवण्यातही आ. रोहित पवार अग्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे.

कर्जत व जामखेडमधील शेतक-यांच्या प्रश्नांचा ३६० डिग्री अँगल विचार करणा-या आ. रोहित पवारांच्या वखार उभारणीसंदर्भातील पाठपुराव्याला यश आले आहे. कर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले तरी,

या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसे. सरकारी हमीभाव केंद्र सुरु झाल्यानंतर मका, तूर यासारखे इतर धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शेतमाल खरेदी पूर्णपणे करता येणे शक्य नव्हते.

परिणामी शेतक-यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून रुजू होताच शेतक-यांच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेत आ. रोहित पवार यांनी तातडीने यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला व अखेर या पाठपुराव्याला यश आले असून शेतक-यांची शेतमाल ठेवण्याची समस्या कायमची नाहीशी होणार आहे.

राज्य वखार महामंडळाकडून कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे तर जामखेड तालुक्यात खर्डा येथे प्रत्येकी ३ हजार मेट्रीक टन क्षमतेचे अजस्त्र अशा वखार उभारणीच्या कामास मान्यता मिळाली आहे. येत्या काही दिवसात वखार महामंडळाकडून वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे व वखार उभारणीचे कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

या दोन्ही वखारींचा प्रामुख्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील हजारो शेतक-यांना शेतमाल, खते, बियाणे ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे. तसेच कर्जत जामखेडसह आजूबाजूच्या तालुक्यातील शेतक-यांनाही या वखारींचा लाभ घेता येणार आहे.

शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम आग्रही असणारे आ. रोहित पवार यांनी वखार उभारणीची संकल्पना मांडून त्यासाठी वेळोवेळी प्रशासकीय बाबींचा पाठपुरावा करून अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कर्जत व जामखेडमधील शेतक-यांनी आ. रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया :- कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतक-यांना शेतमाल ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सरकारी हमीभाव केंद्र सुरु झाल्यानंतर अपु-या जागेमुळे पूर्ण क्षमतेने शेतमाल खरेदी करणे देखील चिंताजनक ठरत होते.

दरम्यान यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर कर्जत मधील मिरजगाव व जामखेडमधील खर्डा येथे वखार महामंडळाकडून वखार उभारण्यात येत आहे.

वखार उभारणीच्या कामाला नुकतीच मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसात वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे व लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेण्यात येईल. वखार उभारणीच्या कामाला मान्यता दिल्याबद्दल राज्य वखार महामंडळ व सहकार विभागाचे आभार मानतो. – आ. रोहित पवार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe