‘त्या’ शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टीने नुकसानग्रस्त ‘या’ तालुक्यातील १४ गावांना आले ३४ लाख

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-  मागील वर्षाच्या रब्बी हंगामातील गहु, हरबऱ्याचे अतीवृष्टीने नुकसान झाल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकरी हतबल झाला होता.

यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील त्या १४ नुकसानग्रस्त गावाना ३४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात बळीराजाने मोठ्या कष्टाने रब्बी पीक घेण्याकरिता कंबर कसुन शेतशिवार पिकवल परंतु नशिबच फाटक, त्याला एकीकडुन शिवायचा प्रयत्न केला की, दुसरीकडुन उसवतं आशीच गत शेवगांव तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली होती.

खरिपात शेतशिवार पाण्याखाली तर रब्बीत अती पावसाने पिके उद्ध्वस्त झाल्याने बळिराजा मेटाकुटीला आला होता. हतातोंडाशी आलेल्या घासावर निसर्गाने घाला घातल्याने शेवगांव पंचायत समितीचे सभापती घुले यांनी नुकसानग्रस्त भागांची पहाणी करत शेतकऱ्यांना अधार दिला.

तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी  शासन दरबारी त्यांनी प्रयत्न केले, वेळोवेळी केलेल्या प्रयत्नाने शेवगांव तालुक्यातील एरंडगाव, लाखेफळ , दहिफळ, खुंटेफळ, कर्जत खु., ढोरहिंगणी,

दादेगाव, ताजनापुर, बोडखे , भायगाव , भातकुडगाव, खामगाव, जोहरापुर,सह  हिंगणगाव ने, या १४ गावातील नुकसानग्रस्त २५१ हेक्टर क्षेत्रासाठी ३३ लाख ९७ हजार १४० रुपयाचा निधी प्राप्त झाल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News