अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन राज्यात वातावरण तापले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव आल्यानंतर या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं आहे. अधिवेशनात या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरुन अडचणीत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अखेर क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली करण्यात आल्याची माहिती विधानपरिषदेत दिली आहे.
काय आहे प्रकरण जाणून घ्या? :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या चर्चेत आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अधिवेशनात सर्वात प्रथम सचिन वाझेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर विरोधकांनी या मुद्यावरुन अधिवेशनात सरकारला घेरलं असून ठाकरे सरकारने अखेर सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणावर गृहमंत्री देशमुख म्हणाले :- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं, मुंबईतील अँटिलिया या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) करत आहे.
तर मनसुख हिरेन यांच्या मृत्युचा आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबासंदर्भात तपास हा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे.
गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून अन्यत्र बदली करण्यात आली आहे. कुणालाही पाठीशी घालणार नसून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. असे प्रतिपादन गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.
राऊतांचा माजी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र :- खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
‘फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षाचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एकप्रकारे सरकारच चालवायचं असतं.
तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचं असेल, तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेलं नाही,’ असा टोला राऊतांनी लगावला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|