अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे.
दरम्यान, प्रेमासंबंधीची माहिती पुस्तकामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद निर्माण झाला आहे.
करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी होली बायबल शब्दावर आक्षेप घेतला आहे.
त्यामुळे आता ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं गेलं आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता त्यावेळी स्वतः धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर संबंधात होतो असा खुलासा केला होता.
एवढेच नाही तर या महिलेपासून आपल्याला दोन मुले असल्याचाही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून खुलासा केला होता. करुणा धनंजय मुंडे, असे त्या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली.
करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे आता या पुस्तकामध्ये कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. करुणा धनंजय मुंडे या नावाने फेसबुक अकाउंट असलेल्या पेज वरून त्यांच्यातील प्रेम कथेचे रहस्य उलगडणार असल्याचे सांगितले गेले आहे. सोबतच एक फोटोही जोडण्यात आला आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहित यावर स्पष्टीकरण दिले होते. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम