अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथे कोरोना नियमावलीचे पालन न केल्यामुळे नंदनवन मंगल कार्यालयात अचानक भेट देत
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने कारवाई केली यामध्ये मंगल कार्यालय कोरोना कालावधी संपेपर्यंत सील करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र आता या लाटेचा कमी होत असल्याने राज्यभरातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही लग्न सोहळे, धार्मीक कार्यक्रमांना काही बंधने घालुन दिलेली आहेत.
यामध्ये लग्नसोहळ्यासाठी १०० लोकांनाच परवानगी दिली आहे. मात्र पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये नंदनवन मंगल कार्यालयात २०० पेक्षा जास्त लोकांमध्ये सामाजिक अंतर पालन न करता विवाह सोहळा सुरू होता.
त्यामुळे ते कार्यालय पोलीस व महसूल पथकाने कारवाई करत सील केले आहे. पारनेर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी लग्न कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत, अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये कोरोना नियमावलीचे उल्लंघन देखील होत आहे.
गेल्या महिनाभरात पूर्वी हिवरेबाजार पॅटर्न प्रमाणे तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यात बहिर्जी नाईक पथक कार्यान्वित केले होते. या पथकाने निघोज येथील नंदनवन कार्यालयांमध्ये लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची माहिती तहसीलदार यांना दिली.
त्यांनी त्वरित पोलिस प्रशासनाला सोबत घेत ही कारवाई केली आहे. तालुक्यात इतरही ठिकाणी करोना नियमावलीचे उल्लंघन होत आहे.
त्या ठिकाणी असणाऱ्या बहिर्जी नाईक पथकाने या संदर्भात प्रशासनाला माहिती कळविण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. दरम्यान तहसीलदारांच्या या धडक कावाईने मात्र कार्यालय चालकांचे धाबे दणाणले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम