त्या दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक; नाहीतर होणार कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

मात्र आता याच पार्शवभूमीवर मनपा आयुक्तांनी एक महत्वपूर्ण सूचना केली आहे. सर्व दक्षता पथक आणि प्रभाग समिती कार्यालय आपल्या प्रभागातील ज्या आस्थापनांना परवानगी आहे,

त्या आस्थापनांची तपासणी करणार असून ज्यांच्याकडे चाचणी रिपोर्ट नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले आहे.

प्रत्येक अस्थापनातील प्रत्येक दुकानदार आणि त्यांचे कर्मचारी यांची चाचणी बंधनकारक असून, नजीकच्या अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात त्यांनी विनामूल्य चाचणी करून

तसा रिपोर्ट जवळ बाळगायचा आहे. २५ मेनंतर ज्या आस्थापनाकडे रिपोर्ट नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News