कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने पिके जळाली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कर्जत तालुक्यात आतापर्यंत कुकडीचे एकच आवर्तन आल्याने तालुक्यातील ऊस, कांदा, कलिंगड तसेच फळबागा व पालेभाज्या जळून गेल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कुकडीची तीन ते चार आवर्तने सुटायची. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नियोजन केले. मात्र पाण्याअभावी पिके जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

कोलमडलेल्या कुकडी आवर्तनाच्या नियोजनामुळे कर्जत तालुक्यातील पिके मोठ्या प्रमाणावर जळून गेली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च निघाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने अनेक वर्षांपासून जपलेली पिके जळून चालली आहे. तसेच शेतकऱ्याचा ऊस करपून गेला आहे, तर पाण्याअभावी कलिंगड अर्ध्यावर सोडून द्यावे लागले.

दरम्यान शेतकऱ्यांचे हाल होत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडुन काही उपाययोजना केल्या जात नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe