कर्मचारी नसल्याने टाकळीढोकेश्‍वरच्या जिल्हा बँकेच्या शाखेत ग्रामस्थांची गर्दी व गैरसोय

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्‍वर येथील जिल्हा सहकारी बँकेतील कॅशियर मयत होऊन चार महिने होऊन देखील त्याजागी नवीन कॅशियरची नेमणुक करण्यात आलेली नाही.

त्यामुळे बँकेत ग्रामस्थांची गर्दी होऊन, मोठी गैरसोय होत असल्याने सदर प्रश्‍नी तातडीने टाकळीढोकेश्‍वर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत कर्मचारी (कॅशियर) उपलब्ध करुन देण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. टाकळीढोकेश्‍वर (ता. पारनेर) जिल्हा बँकेच्या शाखेत कॅशियरचे निधन होऊन चार महिने झाले आहेत.

मात्र अद्यापि बँकेत नवीन कर्मचारीची नेमणुक करण्यात आलेली नाही. यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचारींवर अधिक ताण पडत आहे.

सध्या कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून, जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या वेळेत नागरिक घराबाहेर पडत आहे. गावात विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने कर्ज वाटप झाले आहे.

कर्जाची रक्कम घेण्यासाठी व भरणा करण्यासाठी देखील ग्रामस्थांची मोठी गर्दी होत आहे. बँकेत कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने ग्रामस्थांना मोठी त्रास सहन करावा लागत आहे.

टाकळीढोकेश्‍वर गावाचा विस्तार मोठा असल्याने बँकेत व्यवहार व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी कायमस्वरुपी राहत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सदर बँकेत कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|