DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात होईल वाढ! परंतु त्यामुळे किती वाढेल पगार? वाचा माहिती

Published on -

DA Hike Update:-  येणाऱ्या काही दिवसात केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता असून केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या तयारीत असून जर केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केली तर त्याचा फायदा देशातील 47 लाख कर्मचारी आणि लाखो निवृत्तीवेतनधारकांना होणार हे मात्र निश्चित.

तसे पाहायला गेले तर केंद्र सरकारी कर्मचारी असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी यांच्या विविध प्रकारच्या मागण्या असतात व त्यापैकी घर भाडे भत्ता व महागाई भत्ता याबाबतीत प्रकर्षाने मागणी असते. आपल्याला माहित आहेच की सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये साधारणपणे वाढ करत असते.

दर सहा महिन्यांनी प्रत्येक वर्षी यामध्ये वाढ करण्यात येते. परंतु या वर्षीचा विचार केला तर मार्चमध्ये ही वाढ करण्यात आली. परंतु या महागाई भत्त्यातील वाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासूनच देण्यात येणार आहे.मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने यावर्षी चार टक्के इतकी वाढ महागाई भत्त्यात केलेली आहे.

म्हणजे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा पूर्वीचा महागाई भत्ता 38% होता तो 42 टक्के झाला आहे. परंतु आता लवकरच दुसरी महागाई भत्त्यातील वाढ केंद्र सरकारकडून जाहीर केले जाईल अशी अपेक्षा आहे व ही जी काही नवीन वाढ केली जाईल ती देखील चार टक्के इतकी असण्याची शक्यता असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा बेचाळीस टक्के महागाई भत्ता हा 46 टक्के होण्याची शक्यता आहे. तसेच ही महागाई भत्त्यातील वाढ एक जुलैपासून लागू केली जाईल अशी शक्यता आहे.

महागाई भत्त्यातील वाढ ही प्रामुख्याने एआयसीपीआय निर्देशांकावरून ठरवली जाते. जर आपण जानेवारी चा विचार केला तर एआयसीपीआय निर्देशांक 132.8 अंकावर होता. त्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात एक अंकांनी कमी आली होती व तो 132.7 अंक इतका झाला होता. परंतु त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा त्यात 0.6 अंकाने वाढ झाली व तो 133.3 अंकांवर पोहोचला. एप्रिल मध्ये तो 134.2 अंकावर होता.

 कर्मचाऱ्यांच्या पगारात इतके होईल वाढ

जर आपण सातव्या वेतन आयोगाचा विचार केला तर यामध्ये कमीत कमी बेसिक पगार हा 18000 रुपये आणि कॅबिनेट सचिव स्तरावर 56 हजार 900 रुपये इतका आहे. जर महागाई भत्त्यामध्ये वाढ केली तर या पगारात वाढ होणार आहे. जर महागाई भत्ता 46% झाला तर अठरा हजार रुपयांची बेसिक पगार असेल तर त्यामागे महागाई भत्यातील  वाढ 46% पकडली तर डीए आठ हजार सहाशे चाळीस रुपये होईल.

म्हणजेच याचा अर्थ 720 रुपये प्रत्येक महिन्याला महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. तसेच कॅबिनेट सचिव स्तरावर असलेल्या छप्पन हजार नऊशे रुपये या जास्तीत जास्त बेसिक पगाराच्या एकूण 27 हजार 312 रुपये वार्षिक महागाई भत्त्यात वाढ मिळेल. त्यामुळे नक्कीच महागाई भत्त्यात जर वाढ झाली तर याचा फायदा केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना होईल यात शंका नाही.  साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात  चार टक्के वाढ होईल अशी शक्यता आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe