धोकादायक वाटचाल ; पंधरा दिवसात सातशेहून अधिकांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने पसरू लागला आहे. यामुळे दरदिवशी मृत्यूंची संख्या देखील वाढू लागली आहे.

तसेच वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन देखील चक्रावले आहे. कारण यामुळे अमरधाम मधील ताण देखील वाढला आहे.

यातच शहरातील नालेगाव अमरधाममध्ये गेल्या 15 दिवसांत 721 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे काल दिवसभरात 65 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. शहरात सध्या ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेड व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची कमतरता आहे.

त्यामुळे बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन वेळेत न मिळाल्याने रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. नगर शहरात नालेगाव, नागापूर,

केडगाव व रेल्वेस्टेशन जवळील अमरधाममध्ये मृत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे.

दरम्यान नुकतेच नालेगाव अमरधाममध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक जास्त संख्येने आल्याने अमरधामचे दरवाजे बंद करण्यात आले होते.

तसेच पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला होता. गेली तीन दिवसांपासून दररोज नालेगाव अमरधाममध्ये 65 कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार होत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe