कोरोना पॉझिटिव्ह असूनही शहरात फिरणाऱ्या २ व्यक्तींवर गुन्हे दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोना पॉझिटिव्ह असताना सुद्धा कर्जत शहरात फिरणाऱ्या २ व्यक्तींवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून, या दोन्ही रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिकेव्दारे गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कर्जत येथे पोलिस व नगर पंचायतच्या संयुक्त पथकास दोघे कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील कर्जत शहरात फिरत असल्याचे आढळून आले. नंतर या पथकाने तातडीने या दोघांना ताब्यात घेतले व रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही कोविड सेंटरमध्ये दाखल केले.

या दोघावर पोकॉ मनोज लातूरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस व नगर पंचायतच्या संयुक्त पथकात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव,

सपोनि सुरेश माने, नगरपंचायतचे कर्मचारी राकेश गदादे, विलास शिंदे तसेच पोलीस जवान गाडे, बळीराम काकडे, नितीन नरोटे, मनोज लातूरकर यांचा सहभाग होता.

कर्जत शहरात पोलीस निरीक्षक यादव आणि मुख्याधिकारी जाधव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलीस आणि नगरपंचायत यांची संयुक्त कारवाई सुरू असून यापुढेही असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe