संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जात आरोग्य सर्वेक्षण करा’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करुन रुग्णांना तात्काळ विलग करा. त्यांची शाळेत व्यवस्था करण्यासाठी सरपंच, पोलिस पाटलांनी प्रशासनाला मदत करावी.

खासगी डॉक्टरांनी आपल्याकडे आलेल्या रुग्णांची प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे व लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे,

प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड उपस्थित होते.

दुकानदारांनी डॉक्टरांच्या सूचनेशिवाय परस्पर अौषधे देऊ नयेत. त्यामुळे संबंधित रुग्ण सरकारी नोंदीवर येत नाही.

नागरिकांनी त्रास होत असल्यास वैद्यकीय तपासणी करून कुटुंबापासून सुरक्षित ठिकाणी विलग राहावे,

असे आवाहन थोरात यांनी केले आहे. खासदार लोखंडे व आमदार कानडे यांनी विविध सूचना मांडल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe