अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- झोप ही गोष्ट खाणे आणि श्वास घेणे या दोहोंइतकीच महत्त्वाची आहे आणि अपु-या झोपेमुळे लठ्ठपणापासून ते कमकुवत रोगप्रतिकारशक्तीपर्यंत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असल्याचे संशोधनांतून सिद्ध झाले आहे.
अपु-या किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या झोपेचे कार्यक्षमतेची हानी, अतिताण, चिंता आणि नैराश्य यांच्याबरोबर खूप गहिरे नाते असल्याचे आढळून आले आहे.
पुरेशी झोप मिळत नसेल, तर मेंदूचे व शरीराचे काम सुरळीतपणे चालू शकत नाही आणि त्यामुळे जीवनमानाचा दर्जा लक्षणीयरीत्या खालावतो. म्हणूनच निरोगी मेंदू आणि शरीरासाठी झोपेचे वेळापत्रक नीट सांभाळणे महत्त्वाचे आहे.
सकाळच्या व्यायामामुळे आपल्याला अधिक ताजेतवाने वाटते व आपण दिवसभरातील कामे उत्साहाने करतो.
>> आपापल्या झोपेच्या वेळांवर लक्ष ठेवा. उदाहरणार्थ, तुम्ही सकाळी ६ वाजता उठत असाल, तर तुम्ही रात्री १० वाजता झोपी जायला हवे
>> रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात १.५ ते २ तासांचे अंतर ठेवा; रात्री पचायला जड अन्न खाणे टाळायला हवे. >> झोपेला जाता-जाता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरणे टाळा.
>> प्रौढ व्यक्तींनी किमान ७-८ तासांची झोप घ्यायला हवी.
>> दुपारच्या वेळी खूप वेळ झोपू नका. >> झोपेची योग्य वेळ पाळता आली नाही तरीही मध्यरात्री १२ वाजल्यानंतर झोपणे लांबवू नका, त्यामुळे काही लोकांना नैराश्य येऊ शकते.
>> अपुरी आणि चुकीच्या पद्धतीची झोप ही आजच्या जीवनशैलीशी निगडित सर्वात गंभीर व्याधी आहे आणि सर्व वयोगटांतील व्यक्ती या व्याधीच्या शिकार आहेत. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रत्येकाने दर्जेदार झोप घेण्याचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम