अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुचाकीवर डबल सीट फिरणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे.
यापुढे दुचाकीवर डबल सीट फिरताना आढळला तर अशा व्यक्तींची दुचाकीच जप्त करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी एका दुचाकीवर एकच व्यक्तीने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तरी अनेकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे.
यामुळे प्रशासनाकडून अजूनही निर्बंध शिथील केले नाही. उलट निर्बंध कडक करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
दुचाकीवर डबल सीट आढळून आल्यास अशांची करोना चाचणी करून त्यांची दुचाकी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाने कितीही आदेश काढले तरी लोक दुचाकीवरून विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहे. यामुळे पोलिसांनी आता पुन्हा दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम