संधी गमावू नका ! SBI च्या “या” योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त काहीच दिवस शिल्लक…

Published on -

SBI Deposit Scheme : लोकांना गुंतवणुकीची सवयी लागावी म्हणून बँका अनेक योजना राबत आहेत, अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना. या योजनेने गेल्या काही दिवसांत चांगला परतावा दिला आहे. पण आता या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर थोडं लवकर करावी लागेल. कारण, या योजनेची गुंतवणुकीची मुदत जवळ आली आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी आता गुंतवणूक करणे योग्य ठरेल. लक्षात घ्या सर्व वयोगटातील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि बँक मासिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर गुंतवणूकीवर मिळणारे व्याज देते.

SBI त्यांच्या गुंतवणूकदारांना 400 दिवसांच्या गुंतवणुकीच्या कालावधीसह या ठेव योजनेत जास्त व्याज देते. या योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. गेल्या वेळी गुंतवणुकीची मुदत जूनमध्ये वाढवण्यात आली होती. सामान्य नागरिकांसोबत ज्येष्ठ नागरिक देखील SBI च्या या विशेष FD मध्ये गुंतवणूक करू शकतात. तथापि, दोन्ही श्रेणींसाठी व्याजदर स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहेत.

गुंतवणूकदार 400 दिवसांच्या कालावधीसह SBI अमृत कलश ठेव योजनेत 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणूक करू शकतात. SBI च्या म्हणण्यानुसार, अमृत कलश ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याजदर दिला जाईल, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर दिला जाईल.

व्याज नियम

SBI अमृत कलशच्या गुंतवणूकदारांना मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक अंतराने व्याज दिले जाते. SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर, TDS कापल्यानंतर व्याजाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जोडली जाईल. अमृत ​​कलश डिपॉझिटमध्ये मुदतपूर्व आणि कर्ज सुविधा देखील समाविष्ट आहेत.

SBI FD व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया नियमित नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे कालावधीसाठी FD गुंतवणुकीवर 3% ते 7% दरम्यान व्याज दर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी “एसबीआय व्ही-केअर” ठेव योजनेंतर्गत दिलेला व्याज दर 0.50% च्या अतिरिक्त प्रीमियमसह 3.5% ते 7.50% पर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News