अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोनाने देशात कहर केला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सण उत्सव रद्द करण्यात आले होते.
तर राज्यात यात्रा उत्सव देखील रद्द करण्यात आले होते. हीच परंपरा यंदाच्या वर्षीही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट कायम आहे.
त्यातच यंदाच्या वर्षीचे कोरोनाचा कहर जरा जास्तच असल्याने प्रशासनाकडून अत्यंत सावधानतेने पाऊले उचलली जात आहे, यातच शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावच्या जगदंबेचा यात्रोत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.
दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे.यावर्षी चैत्र पौर्णिमा मंगळवार, दि. २७ रोजी आहे. जगदंबेच्या मंदिरातील पुजारी दरवर्षीप्रमाणे सर्व विधी पार पाडणार आहेत.
मात्र सकाळी येणाऱ्या कावडी, नवसपूर्तीसाठी मंदिरात होणारा आंबील वाटपाचा कार्यक्रम, जळत्या विस्तवावरून चालण्याची (रहाड) व ‘भंदे’चा कार्यक्रम,
गावातून देवीची सवाद्य पालखी (छबिना) मिरवणूक, शोभेच्या दारूची उधळण, जंगी कुस्त्यांचा हगामा हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|