ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला…..! सौर उर्जा प्रकल्प आगीपासून वाचवला अन्यथा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ढवळेवस्ती शेजारील गायरान जमिनीवर असणारा कृषी  सौरउर्जा प्रकल्प आगीपासून वाचवण्यात कर्मचारी व ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून आर्थिक नुकसान टळले .

५० एकर क्षेत्रावर हा आठ मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारलेला आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्डने देवदैठण सौरउर्जा प्रकल्पाच्या पश्चिमेकडील ठिकाणाच्या डोंगरावरील गवताला आग लागल्याचे पाहिले.

ही आग वेगाने सौर ऊर्जा प्रकल्पाकडे येत असल्याचे पाहून प्रसंगावधान राखत त्वरीत सहकाऱ्यांना बोलावून घेतले . वाळलेले गवत, डोंगराळ भाग व वाऱ्याचा प्रचंड वेग यामुळे आग काही वेळात सौरऊर्जा प्रकल्पाच्या कंपाऊच्या आत प्रवेश केला.

गवताचा व मोकळा भाग असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.  यावेळी या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने माती, झाडाच्या फांद्या व फायर उपकरणाच्या साह्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न चालू केले.

तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आले.  सौरउर्जा प्रकल्पाचे करोडो रुपयांचे नुकसान टाळण्यात यश आले. जर ही आग सौर प्लेटच्या जवळ पोहचली असती तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe