जिल्हा दौऱ्यात महसूलमंत्र्यांना आढळून आला समस्यांचा भंडार ; मुख्यमंत्र्यांना धाडले पत्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-करोना उपायोजनेत स्थानिक पातळीवर अडचणी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महसूलमंत्र्यांनी जिल्हा दौरा केला, व तालुकानिहाय पातळीवर करोना संदर्भात त्रुटी आढळून आल्या.

त्यावर उपाययोजना केल्यास करोनावर मात करणे अधिक सोपे होईल, असे म्हणत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच याप्रकरणी महसूलमंत्री थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील पाठवले आहे.

दरम्यान थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे कि, नगर जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा केला. या दौर्‍यात स्थानिक पातळीवरील माहिती तालुक्यातील अधिकारी व लोक प्रतिनिधींशी चर्चा करतांना समजली.

त्यामध्ये स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान 24 ते 48 तासांचा अवधी लागतो. या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही. अनेक तालुक्यांमध्ये रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीट उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णांच्या चाचण्या न झाल्याने, रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते. तसेच नागरिकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर एचआरसिटी करण्याकडे नागरीकांचा कल असतो.

पर्यायाने स्कॅनींग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणे सुद्धा रुग्ण वाढीचे कारण ठरत आहे., रुग्णालयात दाखल करतांना डॉक्टर या एचआरसिटी रिपोर्टचा आग्रह धरतात. याबाबत निश्चित धोरण ठरविणे आवश्यक आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांना औषधे उपलब्ध होईना… पॉझीटिव्ह रुग्णांना देण्यासाठी पॅरासिटामॉल, सिट्रीझिन, झिन्क, अझिथ्रोमायसिन, फॅबीफ्ल्यू या साध्या औषधी शासकीय रुग्णालये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध नाहीत.

त्यामुळे रुग्णाची परिस्थिती खालावून त्यांना पुढील ऑक्सीजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आदी उपचार देण्याची वेळ येते. ही औषधे उपलब्ध होण्याबाबत आवश्यक कार्यवाही व्हावी. अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe