ठाकरे सरकारमधील ‘ह्या’ मंत्र्याच्या पत्नीची ईडीकडून चौकशी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीच्या कारवाया सुरु आहे.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सुडापोटी या कारवाया केल्या जात असल्याचे स्पष्टीकरण यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी दिले आहे.

नुकतेच पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

त्यानुसार ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या स्वप्नाली या पत्नी आहेत.

तसेच काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सूनबाई आहेत. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या त्या मुलगी आहेत. यापूर्वीही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवली होती.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठवली होती. तसेच ईडीने त्यांची प्राथमिक चौकशीही केली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe