जिल्ह्यातील ११ बाजार समितीच्या निवडणुका ६ महिने लांबणीवर

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळ निवडणुका पुढील सहा महिन्यांसाठी (२३ ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ३०६ पैकी २७७ तर, अहमदनगर जिल्ह्यातील १४ पैकी ‘त्या’ ११ बाजार समित्यांवर विद्यमान संचालक मंडळ कारभार पाहणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत. ज्या प्रकरणी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत, अशा बाजार समित्या वगळून अन्य बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

करोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदी प्रक्रियेत निवडणुका घेणे उचित ठरणार नसल्याने बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक किंवा अशासकीय प्रशासक मंडळ कार्यरत आहेत.

त्या प्रशासक किंवा अशासकीय प्रशासक मंडळालाही २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, बाजार समित्यांच्या निवडणुकीकरिता ग्रामपंचायत सदस्य आणि कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्थांमधून निवडून आलेले सदस्य मतदार आहेत.

अशा राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

त्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे योग्य ठरणार असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, जिल्ह्यात नगर, पारनेर आणि श्रीगोंदा या तीन बाजार समित्या वगळता राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, कोपरगाव,

अकोले, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड अशा एकूण ११ बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या बाजार समितीवर पुढील सहा महिने विद्यमान संचालक मंडळच कारभार पाहणार असल्याने निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या

अनेक इच्छुकांना काही वेळ वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, वरील ११ बाजार समित्यांच्या मुदती वेगवेगळ्या तारखेस संपणार आहेत, त्यामुळे ही मुदत कमी अधिक प्रमाणात लाभणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe