घनश्याम शेलार यांची हकालपट्टी करा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंदा तालुक्यातील नेते घनश्याम शेलार यांची कुकडीच्या सल्लागार समितीवरून हकालपट्टी करावी

अशी मागणी कुंभेफळ ग्रामपंचायतीचे सरपंच काकासाहेब धांडे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कुकडी लाभक्षेत्रातील गावात वाडी वस्तीवर शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे.

कर्जत तालुक्यातील कुकडीचे विविध प्रश्न सल्लागार समितीत मांडण्यासाठी व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंदा तालुक्यातील नेते घनश्याम शेलार यांची नियुक्ती केली आहे.

या जागेवर कर्जत तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याची निवड करावी, कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळवून देण्यासाठी घनश्याम शेलार यांनी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही.

उलट यावर्षी अद्याप कर्जत करांना कुकडीचे पाणी मिळाले नाही. यामुळे पिके व फळबागा जळून गेल्या गेल्या दहा बारा वर्षांत अशी स्थिती प्रथमच झाली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या कार्यकाळात कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळाले.

राम शिंदे यांच्या मुळे कुकडीच्या प्रलंबित कामांना सुधारित मान्यता देण्यात आली यासाठी 3977.85 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये कुकडीची प्रलंबित कामे पूर्ण करने, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कुकडी साठी ताब्यात घेण्यात आल्या त्यांना नुकसानभरपाई देणे, गेट बसवने, आदी कामे करण्यात येणार आहेत.

तसेच डिंभे ते माणिकडोह या 16 किलोमीटर अंतर असलेल्या बोगद्याच्या कामाला कृष्णा खोरे विकास महामंडळाने 2019 मध्ये परवानगी दिली. पुणेकरांनी सतत कर्जत – जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला. कुकडी प्रकल्प पूर्ण होऊ नये असे त्यांनी नियोजन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe