कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी वर्तवली ‘ही’ शक्यता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हातपाय पसरले आहे. वर्षभरातून अधिक काळ वास्तव्य केलेल्या या महाकाय रोगाने देशात आजवर लाखो बळी गेले आहे.

यातच कोरोनाची दुसरी लाट ही अतिशय विघातक ठरली आहे. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या

डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लहर येण्याची भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले.

तसेच, कोरोना साथीच्या काळात लोकांची रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशा परिस्थितीत हे कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचे कारणही बनू शकते.

कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक सहजपणे कोरोनाच्या या लाटेत येऊ शकतात, असे डॉक्टर समीरन पांडा यांनी म्हटले आहे. लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.

कोरोना संसर्गाचे नवीन व्हेरिएंट येत आहेत, सरकार लॉकडाऊन आणि इतर निर्बंध कमी करीत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News