अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहाता शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीमध्ये दिलासादायक वृत्त मागील काही दिवसांमध्ये येत होते. हे असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राहाता शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहाता नगरपालिका प्रशासनाने शहरातील व्यवसायिकांना दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.
अशा वारंवार सूचना देऊनही अनेक व्यवसायिक नगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवत नियमाचे पालन करताना दिसत नाही. भाजी व भेळ विक्रेते यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या दोन व्यवसायिकांना तात्काळ शिर्डी येथे उपचारासाठी पाठवले आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सात दिवस घराबाहेर येऊ नये अशा सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
दरम्यान, राहाता शहरात भाजी व भेळ विक्री या दोन व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या व्यक्तींपासून आपल्याला संसर्ग होणार तर नाही अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे.
करोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून देशात लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी सर्व व्यवसाय बंद असल्याने अर्थ चक्र ठप्प झाले. हातावर पोट असलेल्या व्यक्तींना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न भेडसावत होता.
करोना संसर्ग थोड्या प्रमाणात कमी झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने नियम व अटी शितील करून नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी सर्वच व्यवहार सुरू करण्याची परवानगी दिली.
सर्व व्यवहार सुरू झाल्याने नागरिकांची होणारी गर्दी व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायत व नगरपालिका प्रशासन यांना करोना संसर्गाचा धोका वाढू नये
यासाठी शहरातील व्यवसायिकांची दर पंधरा दिवसाला करोना चाचणी बंधनकारक करून त्याचे प्रमाणपत्र दुकानात ठेवण्याचे आव्हान केले होते. असे असतानाही शहरातील काही व्यवसायिक दर पंधरा दिवसाला करोना चाचणी करून घेत नाही.
दुकानात कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंग पाळत नसुन मास्क ही वापर करत नसल्यामुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुरुवारी राहाता शहरामध्ये एक भाजी विक्रेता महिला व भेळ विक्रेता पुरुष यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम