अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-नेवासे तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी मागील महिन्यात स्वतःचा ऊस पेटवून दिला.
कारखाने ऊस घेत नाहीत, असा आरोप करून त्यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप केले. याचे पडसाद आज विधानसभेच्या अधिवेशनात उमटले.
याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले कि, कारखान्यांनी ऊस घेतला नाही म्हणून शेतकरी ऊस जाळून टाकतात.
शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख म्हणतात की आम्ही सर्व ऊस घेऊ. शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांनी घेतला नाही, तर मी स्वतः तेथे येऊन आंदोलन करीन,” असा इशारा फडणवीस यांनी दिला.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले कि, राज्य सरकारने सादर केलेल्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय झाला. ऊस घेतला नाही म्हणून शेतकऱ्यांनी ऊस जाळला. मात्र, मंत्री म्हणाले, की आपण सर्व ऊस घेऊ.
निवडणुका संपल्या की सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष विसरून शेतकऱ्यांचा ऊस घेतला पाहिजे. जर शेतकऱ्यांचा ऊस घेतला नाही, तर मी स्वतः जाऊन तेथे आंदोलन करीन, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|