शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल, असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी डाळिंब उत्पादकांना दिला आहे. मंत्री तनपुरे यांची तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुभाष गवळी, सरपंच अमोल वाघ, राजू शेख, अरुण वाबळे, मधुकर म्हस्के, बापू देशमुख व काही शेतकऱ्यांनी भेट घेऊन मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

संबंधित शेतकऱ्यांनी फळपीक विमा देखील उतरवला जवळपास एक वर्ष उलटत आले आहे तरी देखील संबंधित विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात आलेली नाही इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डाळिंब फळ पीक विम्याची रक्कम देण्यात आलेली आहे.

सुमारे ५० हजार रुपये हेक्‍टरी प्रमाणे ही रक्कम देण्यात आली असल्याची माहिती काही शेतकरी सांगत आहेत. परंतु नगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना देखील या विम्याचा लाभ व्हावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी मंत्री तनपुरे यांच्याकडे केली.

त्यानंतर मंत्री तनपुरे यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून ३० जून पर्यंत डाळिंब फळ पीक विमा धारक शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

करंजी, मिरी, तिसगाव, मढी, निवडूंगे, जवखेडे, चिचोंडी, शिराळ, कोल्हार, सातवड, घाटशिरस, दगडवाडी भोसे, वैजूबाभुळगांव येथील अनेक डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe