तिसऱ्या लाटेची भीती वाढली ! केंद्र सरकारने उचलले हे मोठे पाऊल…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- सध्या देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दिवसागणिक वाढत आहे. तसेच कोरोनाचे नवे रुग्ण खूप वेगाने वाढू लागलेत आणि दररोज 45 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी वाढवण्याची घोषणा केलीय. व्यावसायिक उड्डाणांवर ही बंदी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची ही माहिती डीजीसीएने शेअर केलीय.

याआधी डीजीसीएने 31 ऑगस्टपर्यंत भारतात येण्यासाठी नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सेवा निलंबित केली होती. आता ती एक महिन्याने वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली. हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांना लागू होणार नाही.

या व्यतिरिक्त जर एखाद्या फ्लाईटला डीजीसीएकडून विशेष मान्यता मिळाली असेल, तर हा नियम तेथेही लागू होणार नाही. मार्च 2020 मध्ये सरकारने प्रथमच देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन लादले.

त्या काळात गाड्या, विमानांसह सर्व सेवा सुमारे दोन महिने बंद राहिली. मे महिन्यापासून विमानसेवा पूर्ववत झाली. यामध्ये केवळ देशांतर्गत हवाई सेवेला मंजुरी देण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणावर अजूनही बंदी आहे. या दरम्यान दोन्ही देशांमधील हवाई बबलसह हवाई संपर्क चालू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe