बांधावरून दोन गटांत हाणामारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सामायिक बांधाच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याने राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, २० मे रोजी दुपारी माझे पती व मुलगा आपल्या शेताच्या बांधावर पाहणी करत असताना त्यांना सामायिक बांधावरील गवत, झुडपे ही जाळून टाकलेली दिसून आली.

या बाबत उत्तम सत्रे यांना बांधावरील गवत व झुडपे का जाळलीस, अशी विचारणा केली असता पती व मुलगा यांना शिवीगाळ करून काठी व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केली. उत्तम सत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, वांबोरी शिवारातील शेतीमधील विहिरीच्या काठावरील झुडपे तोडत असताना माणिक सत्रे याने घटनास्थळी येऊन झुडपे का तोडली अशी दमदाटी करत विकास माणिक सत्रे याने मला व पतीला मारहाण केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe