अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर केले.
बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधांमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटीच बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटले आहे.
तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी ही माहिती दिली. बाळ बोठे याच्यासह जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकली, पी. अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली,
अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद) व महेश वसंतराव तनपुरे (रा. अहमदनगर) या आरोपीविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
बोठे याच्याविरोधात कट रचून खून करणे तर उर्वरित सहा आरोपी विरोधात बोठे याला फरार होण्यास मदत करणे या कलमांतर्गत दोष ठेवण्यात आला आहे. बोठे व जरे यांचे प्रेमसंबंध,
त्यांच्यात वारंवार होणारी वादावादी व त्यातून निर्माण होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटीच हे हत्याकांड घडले असल्याचे तपासी अधिकारी पाटील यांनी दोषरोपत्रात म्हटले आहे.
दरम्यान, जरे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर ऊर्फ गुडू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) यांना अटक केली होती. त्यानंतर तीन महिन्यानंतर बाळ जगन्नाथ बोठे याला अटक केली.
त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या सहा आरोपीविरोधात हे पुरवणी दोषारोप पत्र ठेवण्यात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला पाच आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बोठे असल्याची माहिती समोर आली.
हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. बोठे याला तब्बल १०२ दिवसांनंतर हैदराबादेतून अटक केली. या अटकेला गुरुवारी (१० जून) ९० दिवस पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी हे दोषारोपत्र दाखल होणे आवश्यक होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम