टाळेबंदीत सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून उत्तम काम केल्याबद्दल भिंगारला पोलीस उपनिरीक्षकाचा नागरी सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- टाळेबंदीत नियम मोडणार्‍यांवर कारवाई करणारे पोलीस व सर्वसामान्य नागरिकांमध्ये खटके उडतानाचे चित्र पहावयास मिळते.

मात्र टाळेबंदीत नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांचे प्रश्‍न हाताळणार्‍या अधिकार्‍याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भिंगार येथील नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ज्ञानदेव पोटे यांचा सन्मान केला.

यावेळी सुमित गुप्ता, आदेश शिरसाठ, अशोक शिंदे, कुणालसिंग चव्हाण, नितीन सोले आदी उपस्थित होते.

पोलीस कॉन्सटेबल असलेले दत्तात्रय पोटे यांनी काही महिन्यांपुर्वी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत आपली गुणवत्ता सिध्द करुन पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळवली.

त्यांची नुकतीच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला उपनिरीक्षकपदी नेमणुक झाली आहे. टाळेबंदीत भिंगार येथील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

घरी रहा.. सुरक्षित रहा.. हा कायमचा सल्ला देऊन अनेकांचे समुपदेशन करण्याचे त्यांचे अविरत सुरु आहे. तर सर्वसामान्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

काम करण्याची असलेली तळमळ व प्रामाणिकपणा पाहता नागरिकांनी त्यांचा हा सत्कार केला.

सर्वसामान्य नागरिकांनी केलेला हा सत्कार एखाद्या मोठ्या पुरस्कारापेक्षा कमी नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबध्द राहून कर्तव्य बजावत असल्याची भावना पोटे यांनी व्यक्त केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|