मी पुन्हा येईन’ म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या विधानामुळे आले चर्चेत !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणत आपणच सत्तेत कायम असू असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर याच लाईनवरुन फडणवीस यांनी कॅम्पेन देखील सुरु केलं.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचं ‘मी पुन्हा येईन’ हे वक्तव्य चांगलचं गाजलं. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात नविन चर्चा सुरु झाली आहे. नवी मुंबईत एका कार्यक्रमाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे’ असं विधान केलं आहे.

तुमच्या सारखे नेते पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवला नाही की मी मुख्यमंत्री नाही, मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गेली दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही, की आता मी मुख्यमंत्री नाहीए, विरोधी पक्ष नेता म्हणून मी उत्तम काम करतोय, आणि ज्या दिवशी आशिर्वाद मिळेत त्या दिवशी पहिल्यांदाच इथं गोवर्धनी मातेकडेच येणार आहे.

त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापूरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप करण्यात आले.

यावेळी फडणवीस यांनी वरील विधान केले “देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हे शहर नेहमी अग्रेसर राहिलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल.

नवी मुंबईची सेवा करण्याकरिता आमच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये मंचावरील मंडळी कायम तयार असतील”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचं कौतुक केलं आहे. कुटुंबाप्रमाणे आमल्या मतदारसंघाची काळजी करत भूमिपुत्र, आगरी कोळी, महिला विकासांचे उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.

माथाडी कामागारांच्या लसीकरणाचा विषय असेल त्या नेहमीच पुढाकार घेतात. एक्सप्रेस हाय वेवर महिलांसाठी फिरते शौचालयाची सोय करणं हे फक्त आमच्या ताईच करू शकतात, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांचं कौतुक केलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe