अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने भाड्याने चालवण्यासाठी घेतले जात. ती वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
त्याच्याकडून २ कोटी ६९ लाख रुपयांच्या १६ आलिशान कार जप्त करण्याची ही महत्त्वपूर्ण कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते (वय 26 रा. भोयरे गांगर्डा ता. पारनेर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महेश प्रताप खोबरे (वय ४० रा. पिसोळ जि- पुणे) यांचा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.
सातपुते याने खोबरे यांच्याकडून मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये २२ कार महाबली एन्टरप्रायजेस या नावाने भाड्याने चालविण्यासाठी घेतल्या होत्या.
त्यापैकी ९ कार सातपुते याने खोबरे यांना परत केल्या. मात्र, उर्वरित 13 कारचे भाडे व त्या कार खोबरे यांना परत केल्या नाहीत. तसेच कारबाबत काहीही माहिती खोबरे यांना दिली नाही.
त्यामुळे त्यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शशिकांत सातपुते याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुन्ह्याचा तपास सुरु केला.
तपासामध्ये आरोपी दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते याचा शोध घेत त्याला अटक करुन त्याची पारनेर न्यायालयाकडून वेळोवेळी पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून एकूण 16 अलीशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|