रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर दोन तासांची सूट मिळावी

Ahmednagarlive24
Published:

मदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- रमजान सणासाठी नमाज घराघरातूनच अदा करण्यात येणार आहे. मात्र किराणा सामान व इतर किरकोळ खरेदीसाठी लॉकडाऊनमध्ये दोन तासाची सूट मिळावी. लॉकडाऊनला आमचा पाठिंबा आहे.

मात्र लोकभावनेचा विचार प्रशासनाने करावी व सणाला खरेदीसाठी परवनागी देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने तहसिलदार शाम वाडकर यांच्याकडे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रफिक शेख यांनी व समाजबांधवानी केली आहे.

रमजानचा सण १४ मे राजी आहे. लॉकडाऊनमुळे घरातील किराणा सामान संपलेले आहे. त्यामुळे किराणा खरेदीसाठी दोन तासांसाठी लॉकडाऊनमधे सवलत द्यावी, अशी मागणी रफिक शेख, राजु शेख (मिरी), हसन तांबोळी रफिख शेख,

पापा तांबोळी (तिसगाव), रसीद शेख (चिचोंडी), इरफान शेख (जवखेडे), चाँद मणियार, जमीर आतार (पाथर्डी), अलीम पटेल (पागोरी पिपंळगाव),

मुक्तार शेख (मोहोज देवढे) नवीन पठाण(माणिकदौंडी) यांनी तहसिलदार शाम वाडकर यांच्याकडे केली आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून लॉकडाऊनचे पाऊल उचलले आहे. मी वरीष्ठांशी चर्चा करतो, असे वाडकर यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe